“स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार” -एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. वीर सावरकर जयंतीच्या दिवशी वीर सावरकर गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला करण वीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.