NVS-1 उपग्रह लाँच
इस्रोने आज NVS-1 हा उपग्रह श्रीहरिकोटा येथून 10.42 मिनीटांनी प्रक्षेपित केला आहे. उपग्रहाचा प्रमुख उद्देश अचूक वेळेची सुविधा, रेंज आणि नेव्हिगेशन क्षमता प्रदान करणे हा आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे 18 मिनिटांनी पेलोड रॉकेटपासून वेगळे होईल. हे जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये NVS-1 उपग्रह तैनात करेल. दरम्यान, हा उपग्रह 2016 मध्ये प्रक्षेपित केलेल्या IRNSS-1G उपग्रहाची जागा घेईल.