दिल्ली हादरली ! भयंकर पद्धतीने 21 वेळा मुलीला चाकूने भोकसले,दगडाचे ठेचले.
दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात 16 वर्षीय मुलीची चाकूने भोकसून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रात्री रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी साहिल नावाच्या युवकाने मैत्रीण असलेल्या साक्षीची हत्या केली. ही भयानक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी आरोपीने साक्षीच्या पोटात 21 वेळा चाकूने भोकसले आणि नंतर डोक्यात दगड घातला. दरम्यान, आरोपी घटनेनंतर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.