पर्यावरण प्रेमींसाठी खास पर्वणी…
गंगा दशहरा उत्सवाच्या निमित्ताने पवनामाई स्वछता,पवना आरती उपक्रम
अनेक वर्षांच्या आपल्या संस्कृतीचा भाग असणाऱ्या व संपूर्ण भारतभर केला जाणारा गंगा दशहरा उत्सव सध्या सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून गंगा दशहरा उत्सवाच्या निमित्ताने चिंचवड पवना स्वछता,पवनामाई ओटीभरण, आणि पवना आरती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पवना,मुळा व इंद्रायणी या नद्यांचा जिवंतपणा टिकवण्यासाठी आणि शहराच्या पर्यावरणासाठी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र(दिंडोरी प्रणित),
आकुर्डी केंद्राच्या वतीने दिनांक 29 मे 2023 रोजी दुपारी 4 वा मोरया गोसावी घाटावर आयोजित करण्यात आला आहे.या उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभाग सहभागी होत असून आपणही आपल्या प्रतिष्ठित संस्थेच्या कार्यकर्त्यासहित नागरिकांनीही उपस्थित रहावे.या उपक्रमाची माहिती सरोज दाणी यांनी दिली