भोसरी भागातील लांडगे वस्तीतील दोन चिमुकल्या मुलांवर जीवघेणा हल्ला..भटक्या कुत्र्याची दहशत पुन्हा दहशत
पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरीकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
भोसरी भागातील लांडगे वस्ती येथील भटक्या कुत्र्याने दोन चिमुकल्या मुलांवर जीवघेणा हल्ला केला आहे. काल संध्याकाळी ही मुले भोसरी परिसरात खेळत असताना अचानक त्याच्यावर एका भटक्या कुत्र्यांने जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात श्रीजीत काकडे आणि गणेश गायकवाड हे दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात ही दोन्ही मुलं गंभीर जखमी झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.,