ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या नंतर आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माऊलींच्या पालखीचे 11 जून रोजी आळंदीतून प्रस्थान होणार आहे. आळंदीतून निघून पालखी पुण्यातील भवानी पेठ, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, विमानतळ फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस असा प्रवास करणार आहे. 28 जून रोजी पालखी पंढरीत दाखल होईल.