वंचित मुलांना यावर्षी तरी मिळेल का सरकाळी शाळेची बससेवा?
गेल्या वर्षभरापासून रावेत,पुनावळे,किवळे भागातील शाळाबाह्य विद्यार्थी, बससेवे अभावी शाळेपर्यंत पोहचू शकत नाहीत.कोरोना महामारी पुर्वी आपल्या महानगर पालिकेतर्फे या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या शाळेत येण्यासाठी ही बससेवा उपलब्ध होती. परंतु ही बससेवा उपलब्ध करून न दिल्यामुळे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात या वंचित मुलांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.असे सहगामी फाऊंडेशनच्या अध्यक्ष,प्राजक्ता रुद्रवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री.शेखर सिंग यांना सोशल मीडियावर पोस्ट पाठवून निवेदन दिले आहे.
रुद्र्वार यांनी निवेदनात म्हटले आहे की
महानगरपालिकेची शाळा वस्तीपासून साधारण अडीच ते तीन किमी दूर असल्यामुळे व सुरक्षिततेच्या कारणाने ६ वर्षांच्या या लहान लहान मुलांना पायी शाळेत जाणे शक्य होत नाही.तसेच या मजुरांची मुलांना शिकवायची मानसिकता नसताना समुपदेशन करून मुलांचा पाया तयार करून घेण्यात येतो, त्यांना महानगरपालिकेच्या शाळेपर्यंत पोहोचवत आहोत. परंतु बससेवा नसल्यामुळे ही मुलं शिक्षणापासून वंचित रहात आहेेत.गेल्या वर्षी ९ महिने पाठपुरावा घेऊनही काहीही उपयोग झाला नाही. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात मुलांना शिक्षणा पासून वंचित करू नये त्यामुळे किमान यावर्षी तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.