दिघी:साखरपुड्यानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार
साखरपुड्यानंतर वधूकडे शरीर सुखाची मागणी करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर वधूच्या चारित्र्यावर संशय़ घेत लग्नाला सरळ नकार दिला. जून 2022 ते 13 मे 2023 या कालावधीत हा धक्कादायक प्रकार दिघी येथे घडला आहे.
अत्याचार झालेल्या पीडितेने याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.29) फिर्याद दिली असून विकास राजेंद्र पवार (वय 28) बाळू राजेंद्र पवार व तीन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी विकास यांचा 5 मे 2020 रोजी साखऱपुडा झाला. त्यानंतर पीडितेला लॉजवर नेत लग्न करण्याचे आमिष दाखवले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. लग्नाची मागणी करताच पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने लग्नाला नकार दिला.त्यानंतर 22 एप्रिल रोजी महिला आरोपीने फिर्यादीच्या हातावर खलबत्ता मारून हात फ्रॅक्चर केला. त्यानंतर इतर महिला आरोपी व बाळू पवार याने ही पीडितेला शिवीगाळ करत मारहाण केली.यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.