स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाने साजरी,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन
सावरकर यांचे “लहानपण ते स्वातंत्र्यवीर सावरकर” हा प्रवास अभिनेते, व्याख्याते श्री शरद पोंक्षे यांनी त्यांच्या व्याख्यानात उलगडून सांगितला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० वी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरवातीस पल्लवी अनिखिंडी यांनी जयोस्तुते हे गीत सादर केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन टापरे यांच्या हस्ते कुलगुरू वसंतराव गाडगीळ, शरद पोंक्षे यांचा सत्कार करण्यात आला.
कुलगुरू वसंतराव गाडगीळ यांनी संपूर्ण संस्कृत भाषेमध्ये स्वागत व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव केला.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश महिला अध्यक्षा वृषाली शेकदार यांनी निवेदिता एकबोटे यांचे स्वागत केले.
स्वप्नील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. नेहा देवधर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्याधक्ष निखील लातूरकर, प्रदेश सरचिटणीस विजय शेकदार, गौरव कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, स्वराज जोशी, विलास सिन्नरकर, प्रज्ञा टापरे, स्वाती फाटक, मैथिली जोशी, सोनाक्षी फाटक, सुनील शिरगांवकर, संजीव कुलकर्णी, तेजस फाटक यांनी योगदान दिले.