पिंगळे गुरव :सततच्या टोमण्याला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
गेल्या पाच सहा वर्षांपासून सासू व नणंद या मयत विवाहितेच्या पोषाख, केस विंचरण्याची पद्धत, राहणीमान यावरून सतत टोमणे देत होत्या. शेवटी या टोमण्याला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार पिंपळे गुरव येथे रविवारी (दि.28) सायंकाळी घडला.
या प्रकरणी मयत विवाहितेच्या बहिणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन नणंदा व सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत विवाहित महिलेला मागील पाच ते सहा वर्षांपासून हा त्रास सुरु होता. विवाहिता जशी पुण्याला रहायला आली तसे आरोपींनी घरातील किरकोळ कारणावरून, कपडे घालणे, केस विंचरणे किंवा इतरांशी बोलणे यावरून टोमणे देत मानसिक व शारिरीक त्रास केला.
शिवीगाळ व मारहाण करून तिला आत्महत्या कऱण्यास भाग पाडले ज्यामुळे तिने त्रासाला कंटाळून राहत्या घरी फॅनला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. अद्याप आरोपीला अटक केली नसून सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.