September 28, 2023
PC News24
पिंपरी चिंचवड

24 तासांत वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा,आमदार महेश लांडगे यांचा महवितरणाला इशारा.

24 तासांत वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा,आमदार महेश लांडगे यांचा महवितरणाला इशारा

मोशी, प्राधिकरण, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, चक्रपाणी वसाहत, इंद्रायणीनगर या भागात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. यापार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी महावितरण कार्यालयात धडक दिली. भोसरी पावर हाऊस येथील महावितरण कार्यालय येथे तातडीची बैठक घेण्यात आली.भोसरी आणि परिसरातील वीज समस्यांसदर्भात प्रशासन बेजाबदारपणे वागत असून, 24 तासांत वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार रहा. नागरिकांच्या आंदोलनाचे नेतृत्व मी स्वत: करेन, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.
आमदार लांडगे यांनी बैठकीतून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. येथील अधिकारी मनमानी कारभार करीत असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री कार्यालयातूनही महावितरणच्या कारभाराची झाडाझडती झाली.यावेळी महावितरणचे पुणे जिल्ह्याचे अधिक्षक अभियंता सतीश राजदीप, कार्यकारी अभियंता उदय भोसले, दत्ता गव्हाणे, सम्राट फुगे, शिवराज लांडगे, दिनेश यादव, निखील काळकुटे यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी आमदार लांडगे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. गेल्या दोन वर्षांपासून हेतुपुरस्सर भोसरीकरांना वीज समस्या निर्माण केल्या जात आहेत. अनेकदा विनंती, निवेदने देऊनही महावितरणचे अधिकारी उद्धटपणे उत्तरे देतात. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात सोमवारी सोसाट्याचा वारा आणि गारांचा पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला मंगळवारी दुपारीपर्यंत वीज बंद होती. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या. या पाश्वभूमीवर आमदार लांडगे यांनी महावितरण कार्यालयात बैठक घेतली.

भोसरीसह परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो. कमी दाबाचा वीजपूरवठा त्यामुळे घरगुती उपकरणाचे नुकसान होणे. महावितरण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दुरूस्तीच्या कामासाठी दिरंगाई करतात. सर्वसामान्य नागरिक तक्रार करण्यास गेल्यानंतरअधिकारी-
कर्मचाऱ्यांकडून उद्धटपणे उत्तरे देतात. याबाबत अधिकाऱ्यांची भूमिका उदासीनअसते
अशा विविध तक्रारींबाबत बैठकीत चर्चा झाली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक भूमिकेतून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

महावितरण अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. महावितरणची जी कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण होणे अपेक्षितआहे. याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही लांडगे यांनी दिला आहे.

Related posts

निगडी येथे दिवसभर वीजपुरवठा बंद..वाचा काय कारणे..

pcnews24

निगडी ते दापोडी रस्त्यांचे सुशोभीकरण पण फेरीवाल्यांच्या व्यवसायाचे काय?

pcnews24

अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांत बिघाड झाल्याने पिंपरी-चिंचवडचा वीजपुरवठा खंडित.. भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून

pcnews24

पिंपरी-चिंचवड शहरासाठी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्याबाबत निर्णय..मंत्रिमंडळाची मान्यता

pcnews24

पर्यावरण प्रेमींसाठी खास पर्वणी…

pcnews24

नाट्यगृहांची भाडेवाढ करण्यास विरोध नाही. मात्र,ती वाढ अवाजवी असू नये.-भाऊसाहेब भोईर

pcnews24

Leave a Comment