अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त शासकीय कार्यक्रम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298 वी जयंती आहे. यानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे शासकीय कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. त्याआधी भाजप आमदार राम शिंदे यांनी पहाटे चौंडीतील महादेव मंदिरात अभिषेक केला आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलं.