राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केली 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द, अजून 150 महाविद्यालये रडारवर
नवी दिल्ली : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील 40 महाविद्यालयाच्या मान्यता रद्द केली आहे तर देशातील इतर 150 महविद्यालयावर टांगती तलवार आहे.भारत सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ही कारवाई केली आहे. या महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत.
ज्या 150 महाविद्यालयावर टांगती तलवार आहे, त्यावर देखील आगामी काळात कारवाई केली जाऊ शकते. ही महाविद्यालये दर्जेदार न राहिल्यास त्यांची मान्यताही रद्द केली जाईल.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला या 40 महाविद्यालयांच्या तपासणीदरम्यान बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही कॅमेरे, प्राध्यापक यासारख्या कमतरता आढळून आल्या.