September 23, 2023
PC News24
Other

पोक्सो अंतर्गत रोड रोमियोवर गुन्हा दाखल

पोक्सो अंतर्गत रोड रोमियोवर गुन्हा दाखल

चाकण : रविवारी दि.28 मे रोजी चाकण येथील मेदनकरवाडी मध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिला त्रास देणाऱ्या दोन रोड रोमियोवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून साहिल किरण वाघमारे ( वय18) व त्याचा साथिदार ऋशिकेष संजय वाघमारे (वय 19) दोघे राहणारे मेदनकरवाडी यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत असून ती 15 वर्षाची आहे. ती तिच्या शिक्षणासाठी रोज क्लासला जाते व घरी परत येते त्यावेळी आरोपी हे गाडीवरून येवून हॉर्न वाजवत, कॉलर उडवून हाताने इशारे करत व मुलीच्या अंगावर गाडी घातल्यासारखी करत तिला त्रास देत होते. यावरून आरोपींवर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related posts

भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश, महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन एमेरिटस केशब महिंद्रा यांनी वयाच्या ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

pcnews24

उत्तर भारतात ढगफुटी, पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील ११ पर्यटक अडकले

pcnews24

अमेरिका :भारतातून ‘चोरीला गेलेल्या १०० मौल्यवान पुरातन वस्तू …आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोनाल्ड रीगन सेंटरला भेट, नक्की काय संबंध…

pcnews24

वाकड भागातील मानकर चौक व कस्पटे वस्ती परिसरात सुमारे पाच तास वीज खंडित

pcnews24

वर्धापनदिनी शिवसेनेची स्वच्छ्ता मोहीम-लोणावळा लायन्स पॉइंट परिसर केला साफ

pcnews24

महत्त्वाची बातमी: इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये पिंपरी चिंचवड देशात दुसरे तर राज्यात पहिले- शेखर सिंह.

pcnews24

Leave a Comment