फेरीवाल्या आईच्या मुलाने केले एव्हरेस्ट शिखर सर
नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने सिंहगड किल्ल्यावरती अनेक वर्षापासून लिंबू सरबत, ताक विकणाऱ्या सोनाबाई उघडे यांचा मुलगा लहू उघडे यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे. याबद्दल लहुचे शाल श्रीफळ व पुस्तक देऊन अभिनंदन केले. महासंघाने खारीचा उचलत जमा केलेले अर्थसहाय्य देऊन 28 मार्च रोजी ध्वज व शुभेच्छा दिल्या होत्या.
याप्रसंगी गिर्यारोहक लहू उघडे म्हणाले की जीवनात अशक्य असे काहीच नाही. फक्त जिद्द, प्रयत्न, मेहनत आणि चिकाटी असावी लागते. एव्हरेस्ट लढाई सोपी नव्हती. निधी तर नव्हताच मात्र सर्वांनी मला मदत केली. सर्वांचे,प्रसार माध्यमांचे व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते उपस्थित होते ते म्हणाले, प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एक उद्दिष्ट, एक ध्येय ठेवलेले असते अशाच पद्धतीने एका फेरीवाल्या आईचा मुलाने गिरीमोहिमेमध्ये यशस्वी झाला याचा आनंद होत आहे. कष्टकरी कामगारांच्या मुलांनी विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन करणे गरजेचे आहे त्यासाठी महासंघ आपल्या परीने सहकार्य करेल.
कार्यक्रमाला जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे प्रसाद बागवे, किरण साडेकर, परमेश्वर बिराजदार, बालाजी लोखंडे, नाना कसबे, ओमप्रकाश मोरया, शंकर भंडारी, फैजआलम, अमोल , भंडारी,कृष्णकुमार सिंग, समित हुसेन, रुपेश सिंह, फैजल आलम, लाला सोलंकी, अझहर शेख, गोपाल सोलंकी उपस्थित होते.