‘अहिल्यादेवींचे नाव देण्याचा निर्णय योग्य ‘
अहमदनगरचे नाव बदलून या जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव दिले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले. नगरचे अहिल्यादेवी होळकर नगर असे नाव करणे चांगलेच आहे, असे ते सोलापुरात पत्रकार परिषदेत म्हणाले. दरम्यान शिंदे सरकारने याआधी औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव केले आहे.