घड्याळ चिन्ह वापरायचे असेल तर….
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. त्यामुळे आता चिन्हासाठी राष्ट्रवादीला परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राबाहेर ‘घड्याळ’ हे पक्षचिन्ह निवडणुकीत वापरायचे असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल. त्यावर निवडणूक आयोग निर्णय देणार चिन्ह वापरायचे किंवा नाही..