राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज यंदा
शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. त्यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. रायगडावर आज शिरकाई मंदिरात पूजा करण्यात आली. या सोहळ्यात आजपासून (1 जून) रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवभक्तांना ने-आण करण्यासाठी वाहनतळ ते पाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत 150 बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत.