पाण्यासाठी कर्नाटकचे एकनाथ शिंदेंना पत्र
उत्तर कर्नाटकच्या अनेक जिल्ह्यांत पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. तसेच कृष्णा आणि भीमा नदीतून पाणी सोडण्याची विनंती त्यांनी शिंदे यांना केली आहे. कर्नाटकात लोकांना पाणी पुरवठा सुरळित करण्यासाठी महाराष्ट्राने कृष्णा नदीतून 2 टीएमसी व भीमा नदीतून 3 टीएमसी पाणी सोडावे, असा उल्लेख या पत्रात आहे.