बुधवारी पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह काही भागात गारपीट, अनेक ठिकाणी नुकसान.
बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात मेघगर्जनेसह जोरदार पावस पडला. हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. सकाळ पासून पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. साडेचारच्या सुमारास ढग दाटून आले आणि काही वेळातच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील काही उपनगरांमध्ये बर्फवृष्टीचा अनुभव शहरवासीयांनी घेतला.
निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी आदि भागात सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस होता तर देहू भागात बर्फाचे थर साठले होते. मे महिन्याच्या शेवटी झालेल्या या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मावळ परिसरामध्ये गहू, हरभरा, बटाटा या पिकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तर दुसरीकडे वातावरणातील या बदलामुळे आजार वाढण्याची शक्यता देखील पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या डॉक्टरांनी वर्तवली आहे. तसेच, विक्रेते व फेरिवाल्यांचे मोठे नुकसान तीन दिवसांपासून होत असल्याने त्यांना देखील आर्थिक फटका बसला आहे. वाहतूक कोंडी होत असल्याने चाकरमान्यांची व सर्वसामान्यांची धांदल उडत आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहन चालकांची कसरत होत आहे.
सोसाट्याच्या वाऱ्याने वीजेच्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला व त्याचा फटका व गेली तीन दिवस (MSME) औद्योगिक कंपन्यांना बसला असून त्यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.