March 2, 2024
PC News24
कलाजिल्हा

लेखणी सावरकरांची मधून उलगडले स्वा. सावरकरांचे प्रेरणादायी सहित्य

लेखणी सावरकरांची मधून उलगडले स्वा. सावरकरांचे प्रेरणादायी सहित्य

सावरकरांचे अष्टपैलू आणि प्रज्ञावंत व्यक्तिमत्व त्यांच्या विपुल साहित्य लेखनातून प्रकट झालेले आहे याचा पुनःप्रत्यय देणारा *लेखणी सावरकरांची* हा कार्यक्रम निवारा सभागृह पुणे येथे २४ मे रोजी सादर करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावरकरांच्या समग्र साहित्याची अनुभूती श्रोत्यांनी घेतली.

*लेखणी सावरकरांची* या कार्यक्रमाची संकल्पना
संयोजन आणि संहिता लेखन माधुरी अरुण जोशी यांचे होते.
कार्यक्रमाची सुरूवात नृत्यातून सादर झालेल्या शिवआरतीने झाली. सावरकरांच्या देशप्रेमाची गीते,तुम्ही आम्ही सकल हिंदू!बंधू बंधू!’ तसेच एकात्म गीत, सप्तर्षी सारखं दीर्घकाव्य,
उर्दू गझल,बाजीप्रभूंचा पोवाडा कार्यक्रमात सादर झाला.तसेच ‘स्वदेशीचा फटका’, संन्यस्त खड:ग नाटकातील पद, फडासाठी लिहिलेली ‘छंद नसे चांगला ‘ ही लावणी,
भाषाशुद्धीची जनजागृती,
‘विज्ञाननिष्ठ सावरकर’, अशा अनेक साहित्य प्रकारांचा मागोवा या कार्यक्रमातून घेण्यात आला
स्वा. सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त साजरा झाला.स्वा.सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह अंतर्गत महाराष्ट्र शासन पर्यटन महामंडळ,विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सादर झाला.
माजी नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे प्रमुख पाहुण्या तर डॉ.प्रसाद पिंपळखरे यांच्या हस्ते नटराज आणि स्वा.सावरकर प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ.प्रसाद पिंपळखरे यांनी त्यांचे आजोबा भावे यांचा सावरकरांशी असलेला घनिष्ठ संबंध असल्याने सावरकरांचे पत्रांतून व्यक्त केलेले विचार मांडले.
सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने,लोककला अभ्यासक डॉ.भावार्थ देखणे,अभिनेते अरुण पटवर्धन,डॉ.अंजली जोशी,संस्कार भारती प्रांत पदाधिकारी मिलिंद भोळे, केंद्र पदाधिकारी डॉ.नयना कासखेडीकर आदी मान्यवर, कार्यकर्ते आणि सावरकरप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली.
कल्याणी साळेकर,तनया कानिटकर,ईशा वेलणकर यांनी नृत्य सादर केले.
संजीवनी टोपे,सीमा भोळे,दीपा केळकर,
पल्लवी पाठक,मकरंद घाणेकर,अस्मिता दाते,गजानन पिंगळे,
मीनल जोशी,मानसी आपटे, मेधा गोखले,
प्रदीप बर्गे,अनुपमा कुलकर्णी,केतकी देशपांडे, सतीश कारेकर अनुराधा खेर या सर्व कलाकारांनी उपस्थितांची दाद मिळवली.
‘देवी भगवतीचे जयोस्तुते’ ह्या नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
पुणे महानगरच्या सचिव धनश्री देवी यांनी प्रास्ताविक केले. माधुरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Related posts

Thane : ठाण्यातील काही भागात पाणी कपात!

Admin

हिंजवडी पोलिसां कडून जबरी चोर्‍या करणार्‍यांचा पर्दाफाश,चांदणी चौक परिसरातील अनेक गुन्हयांची उकल.

pcnews24

भरत जाधव हसवणार नाही तर रडवणार.

pcnews24

नाट्यगृहांची भाडेवाढ करण्यास विरोध नाही. मात्र,ती वाढ अवाजवी असू नये.-भाऊसाहेब भोईर

pcnews24

समुपदेशन कार्यक्रमातून चार वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीसोबत घडलेली बलात्काराची घटना उघड

pcnews24

डॉ.हेडगेवारांच्या भूमिकेत झळकणार शरद पोंक्षे.

pcnews24

Leave a Comment