September 28, 2023
PC News24
गुन्हाधर्म

पुण्यातील मंचर येथे लव्ह जिहाद?..गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

पुण्यातील मंचर येथे लव्ह जिहाद?..गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

पुण्यातील मंचर येथे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी करून मुलीला व तिच्या नातेवाईकांना पत्रकारां समोर हजर केले व एकच खळबळ उडवून दिली आहे.

देशभर ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची आणि लव्ह जिहादची चर्चा सुरु असताना पुण्यातील मंचरमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. मंचरमधून अल्पवयीन मुलीला 2019 मध्ये पळवून घेऊन जात तिच्याशी मुस्लिम मुलाने लग्न केलं. 2019 पासून या मुलीचा शोध सुरु होता, मात्र अखेर ते दोघेही मंचरमध्ये परतल्याने आणि त्यात तिचं लग्न जावेद शेख सोबत झाल्याचं समोर आल्यानंतर हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचं सांगण्यात येत आहे. मुलगी जेव्हा घरी परतली तेव्हा ती हिजाब मध्ये होती.

22 मे 2019 ला अल्पवयीन मुलीला मंचर मधून घेऊन पळालेला तरुण चार वर्षांनी परतला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मुलीच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार ही दाखल केली. मात्र तिचा शोध लागत नव्हता. ते पसार झाले होते. तेव्हा मुलगी अकरावीत शिकत होती, तर मिळेल ते काम करणारा जावेदचं दहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. अशा परिस्थितीत दोघे घर सोडून गेले होते. महाराष्ट्र महाराष्ट्रसह सुरत आणि उत्तरप्रदेशात त्यांनी चार वर्षे काढली. या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये काम करून उदरनिर्वाह केला. या दरम्यान ती सज्ञान झाली आणि दोघांनी कोर्ट मॅरेज करत निकाहनामा ही केला. त्यानंतर तब्बल चार वर्षानी ते मंचरमध्ये परतले. आठवड्याभरानंतर कुटुंबियांना ती गावात आल्याचं समजलं, त्यांनी पोलिसांना याबाबत सांगितलं. मग पोलिसांनी तिला बोलावून घेतला आणि वैद्यकीय चाचणीसाठी तिला रुग्णालयात पाठवलं, तिथं डॉक्टरांनी काही प्रश्न विचारले असता. तिच्या बोलण्यातून हा घडला प्रकार समोर आला. त्यात तिचा छळ करण्यात आला होता का? तिचे जबरदस्तीने धर्मांतर केले होते का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी जावेदला अटक केली असून 363 सह 376 आणि पॉस्कोच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या जावेद येरवडा तुरुंगात आहे व पोलिस पुढील तपास करीत आहेत.

या सगळ्या प्रकारात मुलाच्या कुटुंबीयांचा देखील समावेश आहे, असं बोललं जात आहे. मात्र 2019 मध्ये हे दोघे पळून गेले होते. त्यावेळी आईवडिलांकडे मुलासंदर्भात चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी मुलगा घरी नसल्याचं आणि त्याच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचं आईवडिलांनी सांगितलं होतं. या प्रकरणी आता त्यांच्या आईवडिलांची देखील सखोल तपासणी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

Related posts

खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली दीड लाख लाच; सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायाला अटक.

pcnews24

मुंबई:रहिवासी संकुलात विनापरवानगी ईदची कुर्बानी चुकीची.

pcnews24

पुण्यात दहशतवादी संघटना PFI ने पाय पसरले.

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

जुनी भांडणे सोडवल्याच्या रागातून तरुणाला मारहाण; तिघांना अटक

pcnews24

घरफोडी गुन्ह्यातील सराईत आरोपींना अटक,सर्व अटक आरोपी पिंपरी चिंचवडमधील.

pcnews24

Leave a Comment