संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती नाट्य कार्यशाळेचा समारोप दमदार अभिनयाने रंगला.
संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या नाट्यविधेतर्फे घेण्यात आलेल्या नाट्य शिबिराचा समारोप 28 मे रोजी आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी येथे संपन्न झाला.ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध निरुपणकार,
व्याख्याते डॉ.भावार्थ रामचन्द्र देखणे यांची उपस्थिती लाभली. आपल्या मनोगतात कलाकाराने आपल्यातील कलाकार न दडवता तो कसा घडवावा,कलेतला आनंद कसा ओळखावा त्याचा अनुभव कसा घ्यावा याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
या नाट्य कार्यशाळेचे आयोजन दिनांक 6 मे ते 28 मे 2023 या कालावधीत दर शनिवारी व रविवारी करण्यात आले होते.
या कार्यशाळेस प्रसिद्ध अभिनेता,दिग्दर्शक, लेखक,श्री.योगेश सोमण(अभिनय,कला
व अभिनय शैली) श्री.नितीन धंदुके (आवाजातील चढउतार,देहबोली व हावभाव) प्रसिद्ध कलाकार चैताली जाधव,(ऑडिशन,व्यक्तिमत्त्व विकास)श्री.माधव जोगळेकर(दिग्दर्शन, प्रकाश व संगीतयोजना) यांनी सर्व नाट्य प्रशिक्षणार्थीना अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
श्री. तेजस चव्हाण यांच्या रेझोनन्स या स्टुडिओला प्रशिक्षणार्थींनी भेट दिली, अतिशय अनोख्या पद्धतीने रेकॉर्डिंग, नाट्यसंगीत याबद्दलचे मार्गदर्शन केले.
श्री. मनोहर जुवाटकर (मेकअप, प्रॉडक्ट्स मेकअपचे प्रकार) याबद्दल सुंदर मार्गदर्शन केले.
शिबिरार्थीनी काही स्वलिखीते या शिबिरा मध्ये सादर केली.
शिबिरा दरम्यान बसवलेल्या संहितांचे सादरीकरण करण्यात आले. सहभागी सर्व प्रशिक्षणार्थीना संस्थेचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रातिनिधिक स्वरूपात शिबीरार्थी सौ. गौरी पुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव सौ. प्रणाली महाशब्दे यांनी तर आभार सचिव सौ. लीना आढाव यांनी मानले.
नाट्य कार्यशाळा यशस्वी करण्यास समिती अध्यक्ष श्री सचिन काळभोर, उपाध्यक्ष श्री प्रफुल्ल भिष्णुरकर, उपाध्यक्ष श्री हर्षद कुलकर्णी, सचिव लीना आढाव, सहसचिव प्रणाली महाशब्दे नाट्यविधेतील संयोजक आणि सह संयोजक, सदस्य सौ ज्योती आपटे,श्री.माधव जोगळेकर, श्री सारंग चिंचणीकर, श्री स्वप्निल शिंदे, सौ शोभा पवार झेतसेच कलासाधक
सौ संचिता सागवेकर, सौ सुधाताई लच्च्यांण आणि विद्यार्थी, श्रीमती छाया गायकवाड,सर्व कलारसिक, भारत माता भवनचे व्यवस्थापक ह्यांचे
मोलाचे सहकार्य लाभले.