डीआरडीओ वर कुरुलकरांच्या जागी जोशींची वर्णी,कोण आहेत जोशी ?
पुणे – हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या प्रकरणात पायउतार झालेले डीआरडीओचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकरांच्या पदाचा पदभार डॉ. मकरंद जोशींनी स्विकारला आहे. जोशींनी अमेरिकेतील क्लेमसन विद्यापीठातून इंजिनिअरिंगमध्ये पीएचडीची पदवी मिळवली. आर अँड डीईमध्ये त्यांनी तंत्रज्ञान, उत्पादन तयार करण्यासाठी योगदान दिले आहे. दरम्यान, या प्रकरणात कुरुलकरांना एटीएसने अटक केली आहे.