अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ‘रिअल’ हिरो… पुणे ते लोणावळा बस ड्रायव्हिंगचा व्हिडिओ व्हायरल
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या कौतुकाचा एक प्रसंग प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे.
कोथरूडच्या नाट्याचा प्रयोग रात्री साडेबारा वाजता संपला. जेवण आटपून सर्व कलाकार 2 वाजता मुंबईच्या प्रवासाला निघाले. एवढ्यातच त्यांच्या बसचा चालक प्रवीण यांची तब्येत अचानक बिघडली. संकट कोणत्याही काळी कधीही येऊ शकते. परंतु, या संकटावर मात करणारे नेहमीच हीरो ठरतात. त्यातलाच हा एक अभिनेता कलाकार संकर्षण कऱ्हाडे केवळ चित्रपट आणि नाट्यातलाच नव्हे तर रिअल लाईफ हीरो ठरला आहे. संकर्षणने स्वतः चालक होत लोणावळा पर्यंत बस चालवत सर्वांना थक्क केले आहे.
प्रसंग असा की, नाट्याचा प्रयोग रात्री साडेबारा वाजता संपला आणि जेवण होईपर्यंत पहाटेचे दोन वाजले सर्व नाट्यमंडळी मुंबईच्या प्रवासाला निघाले.
एवढ्यातच त्यांच्या बसचा चालक प्रवीण याची तब्येत अचानक बिघडली. चालकच आजारी पडल्याने सगळे काळजीत पडले. पण संकर्षण थांबला नाही. त्याने चालकाला मागे झोपवले आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला ते थेट लोणावळ्यापर्यंत बस चालवली. लोणावळ्याला चालक प्रविणला बरे वाटले तेव्हा संकर्षणने गाडी थांबवून त्याच्या हाती बस सुपूर्द केली.