मे 23 जीएसटी कलेक्शन ₹1,57,090 कोटी, मे 2022 पेक्षा वाढ
जीसीटी लागू झाल्यापासून 5 व्यांदा ₹1.5 लाख कोटीचा टप्पा पार झाला आहे तसेच गेले सलग 14 महिने मासिक जीएसटी महसूल ₹1.4 लाख कोटीहून अधिक मिळाले आहे.
मे 2023 या महिन्यात,₹ 28,411 कोटी सीजीएसटी, ₹ 35,828 कोटी एसजीएसटी तर ₹ 81,363 कोटी आयजीएसटी (वस्तूंच्या आयातीतून मिळालेल्या 41,772 कोटी रुपयांसह) तर ₹11,489 कोटी रुपये उपकर (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 1,057 कोटी रुपयांसह) असे एकूण ₹1,57,090 कोटी, एकूण वस्तू आणि सेवा कर महसूल संकलित झाला आहे.
सरकारने ₹ 35,369 कोटी सीजीएसटी म्हणून तर ₹ 29,769 कोटी आयजीएसटीमधून एसजीएसटी अशी तडजोड केली आहे. या नियमित तडजोडीनंतर मे 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल ₹ 63,780 कोटी सीजीएसटीच्या माध्यमात तर ₹ 65,597 एसजीएसटीच्या माध्यमात आहे.
मे 23 मध्ये जमा झालेला वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल मागच्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 12% जास्त आहे तर वस्तू आणि सेवा कर महसुलात संकलन मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसूल संकलनापेक्षा 12% ने जास्त आहे. तसेच देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मे 22 पेक्षा मे 23 मध्ये मिळालेला महसुल 11% जास्त आहे.