दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर,कोकण विभागाने मारली बाजी निकाल 98.11 टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC Result 2023) वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून 93.83 टक्के निकाल लागला आहे. यात कोकण विभागाने 98.11 टक्के निकाल देवून राज्यात बाजी मारली आहे तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा हा 92.05 टक्के एवढा लागला आहे. यात मुलींनी बाजी मारत एकूण 95.83 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 92.05 टक्के एवढी आहे.
SSC Result 2023 विभागीय निकाल :
१)कोकण विभाग – 98.11 टक्के
२)कोल्हापूर विभाग – 96.73टक्के
३)पुणे विभाग – 95.64 टक्के
४)मुंबई विभाग – 93.60 टक्के
५)औरंगाबाद विभाग – 93.23 टक्के
६)लातूर विभाग – 92.67 टक्के
७)अमरावती विभाग – 93.22 टक्के
८)नाशिक विभाग – 92.22 टक्के
९)नागपूर विभाग – 92.05 टक्के
नऊ विभागांमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8 लाख 44 हजार 116 मुले आणि 7 हजार 33 हजार 67 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5 हजार 33 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. यातील 14 लाख 57 हजार 218 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत.