नथुशेठ वाघमारे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या अध्यक्षपदी निवड
वडगाव मावळ येथे पक्ष कार्यकारिणीची सभा पार पडली. यावेळी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या अध्यक्षपदी, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य नथुशेठ वाघमारे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले व त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
वाघमारे हे शिरगाव शिर्डी येथील रहिवासी असून मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यपदी भटक्या विमुक्त गटातून प्रचंड मताधिक्यानी निवडून आले आहेत. त्यांचा नैसर्गिक सेंद्रिय खत विक्रीचा मावळ आणि पुणे जिल्ह्यात व्यवसाय आहे.
मावळ तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजाचे संघटन करणे आणि त्यांना शासनाच्या सवलतीचा विशेष लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे वाघमारे यांनी नियुक्तीनंतर सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे, आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले.