संगनमत करून अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले.. ‘बालविवाह प्रतिबंधक’ कायद्या अंतर्गत 15 ते 16 जणांविरोधात गुन्हा दाखल
नवरी मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील लग्न केले म्हणून नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे तर 14 जणां विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 मे ते 2 जून 2023 या कालावधीत घडला आहे.
याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी नवरा मुलगा राहूल सुरज भोसले (वय 22 रा.पिंपरीगाव) याला अटक केली असून सात महिला आरोपी, रोहन राजेंद्र कांबळे (वय 22), लालसो कांबळे (वय 70), तुषार गायकवाड (वय 22), अल्पवयीन मुलगा, शिवाजी साळवे (वय 45) व अटक आरोपीचे तीन मावस भाऊ यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायदा व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अल्पवयीन आहेत हे माहिती असतानाही आरोपींनी संगनमत करून मुलीचे लग्न लावून दिले. तर अटक आरोपीने पीडितेवर बळजबरी करत शारीरिक संबंध ठवले. शिवीगाळ व मारहाण करत शारीरिक व मानसिक त्रास दिला. यावरून पोलिसांनी 15 ते 16 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.