September 28, 2023
PC News24
धर्मपिंपरी चिंचवड

केवळ पन्नास आळंदीकरांनाच प्रस्थान सोहळ्यात पालखीला खांदा देण्यासाठी प्रवेश,संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान प्रवेश मर्यादित

केवळ पन्नास आळंदीकरांनाच प्रस्थान सोहळ्यात पालखीला खांदा देण्यासाठी प्रवेश,संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान प्रवेश मर्यादित

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानच्या यंदाच्या सोहळ्यात 11 जूनला प्रत्येक दिंडीतील मोजक्या 75 वारकऱ्यांना आणि पालखीला खांदा देणाऱ्या 50 आळंदीकरांना प्रवेश दिला जाणार आहे. अनावश्यक गर्दी व चेंगराचेंगरी सारखे प्रसंग टाळण्यासाठी आळंदी देवस्थान, वारकरी, ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या बैठकीच्या चर्चेप्रमाणे मर्यादित लोकांनाच प्रवेश देणार आहे.

याबाबत पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांनी माहिती दिली. दरवर्षी गर्दीमुळे प्रस्थान सोहळा उशिरा पार पाडतो. वारकऱ्यांना पुन्हा पहाटे उठून वाटचाल करावी लागते. प्रस्थान वेळेत आणि सुरळीत निर्विघ्नपणे पार पडावे. यासाठी देवस्थानने यापूर्वी वारकऱ्यांसोबत बैठका घेतल्या. सर्वांना निर्णयाची कल्पना आहे. भाविकांची चेंगराचेंगरी होऊ नये,याला निश्चित एक मर्यादा असावी

त्या भाविकांच्या सोहळ्यास कुठे बंधन म्हणून नाही, तर फक्त गर्दी आणि चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना होऊ नये यासाठी निर्णय घेतला. त्याच प्रमाणे सोहळ्यातील वाटचालीत पालखी मार्गावर येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये. यासाठी ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल, त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था व सावलीची व्यवस्था करावी. तसेच, पायी पालखी सोहळ्यादरम्यान निश्चित रुपी भाविकांना थंड पेय व ताक याची सोय करावी. ते म्हणाले प्रस्थान काळात पत्रकारांची संख्या कमी करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली होती. यामुळे पत्रकारांच्या संख्या ही मर्यादित केल्या जाणार आहे. यामध्ये प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया पत्रकरांना दरवर्षी प्रमाणे पास देतील. मात्र हौशी छायाचित्रकार, युट्युब व फेसबुक याद्वारे प्रसारण करणाऱ्यांवर बंधन असून प्रवेश दिला जाणार नाही.

दरवर्षी प्रस्थान दिवशी पालखीला खांदा देण्यासाठी आळंदीकरांची गर्दी असते. यावरही नियंत्रण आणले आहे. केवळ पन्नास आळंदीकरांनाच प्रस्थान सोहळ्यात पालखीला खांदा देण्यासाठी प्रवेश दिला जाणार असल्याचे देवस्थान आणि आळंदीकरांच्या बैठकीत ठरले. यावेळी बबनराव कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, विलास घुंडरे, सचिन गिलबिले यांच्यासह पोलीस आधिकारी उपस्थित होते.

Related posts

शिक्षकांसाठी खुषखबर !! पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत 209 पदांवर भरती- ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

pcnews24

चिंचवड मध्ये विहार सेवा ग्रुपचे महाराष्ट्रातून १४०ग्रुप उपस्थित, वार्षिक संमेलन भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात संपन्न

pcnews24

ब्रेकिंग न्यूज -मराठा आरक्षणासाठी युवकाने घेतले विष.

pcnews24

24 तासांत वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा,आमदार महेश लांडगे यांचा महवितरणाला इशारा.

pcnews24

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी वर्गणीबाबत दिल्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना

pcnews24

गुरुपौर्णिमेचे महत्त्व जाणून घ्या !

pcnews24

Leave a Comment