संस्कार भारती पिंपरी चिंचवड मासिक संगीत सभेतील पारंपरिक शास्त्रीय बंदिशींना रसिकांची दाद
संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या वतीने सादर झालेल्या मासिक संगीत सभेतील शास्त्रीय बंदिशींना रसिकांनी अतिशय सुरेख दाद दिली.
सौ सुधा लच्याण यांनी किराणा घराण्याची पारंपरिक शास्त्रीय बंदिश सादर केली.
पुरीया धनश्री रागात गायलेल्या ‘अब तो रितू मान’ (विलंबित एकताल) व त्यानंतर पायलिया झंकार (द्रुत, तीनताल)ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्या शिष्य परिवाराने राग भूप मधील छोटा खयाल ‘दे दर्शन’ आणि तराना गाऊन रसिकांची दाद मिळवली.
‘अबीर गुलाल’ व ‘टाळ बोले चिपळीला’ या विठ्ठलाच्या सुंदर अभंग सादरीकरणात प्रेक्षक रंगून गेले होते.
कार्यक्रमाची सुरवात श्री विठ्ठलाच्या आरतीने झाली.संगीत विधा सह प्रमुख सौ. शर्मिला शिंदे अणि सौ.सुधा लच्याण ह्यांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन केले.
श्री पियुष कुलकर्णी यांनी संवादिनी,आणि श्री विष्णू गलांडे यांची तबला साथ व श्री कुमार कुलकर्णी यांनी टाळावर सुंदर साथ केली.
श्री सारंग चिंचणीकर ह्यांनी संस्कार भारती सदस्य नोंदणी विषयी माहिती दिली.
“विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा” ह्या अप्रतिम गजराने कार्यक्रमाची सांगता केली.