मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे आजचे लोकार्पण रद्द
ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघाताने मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे आज 3 जूनला होणारे लोकार्पण रद्द करण्यात (Vande Bharat Express ) आले आहे. या अपघातामध्ये 200 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
आज 3 जूनला मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण होते. सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नवी दिल्लीच्या कार्यालयातून, मुंबई येथून सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते. तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मडगाव रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहून स्वागत करणार होते.
भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात ओडिशा मध्ये झाला असून संपूर्ण देश दुःखामध्ये बुडाला आहे. अश्या वेळी हे लोकार्पण उचित नसल्यामुळे ते रद्द करण्यात आले आहे.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ओडिशा ट्रेन अपघाताच्या घटनास्थळी गेले आहेत तर पी एम व एच एम बारकाईने लक्ष घालून व्यवस्थेची माहिती घेत आहेत.