September 28, 2023
PC News24
पिंपरी चिंचवडशाळा/महाविद्यालय/शैक्षणिक

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे पैसे मिळणार थेट बँक खात्यावर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे पैसे मिळणार थेट बँक खात्यावर

प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे पैसे थेट बँक खात्यावर (डीबीटी) 1 जुलैपर्यंत देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.

शासनाच्या पारदर्शक धोरणाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे त्याचा थेट फायदा विद्यार्थांना मिळेल.मागील शैक्षणिक वर्षी डीबीटीचा निर्णय होऊ शकला नव्हता.

दरवर्षी महापालिकेच्या वतीने दोन शालेय गणवेश, एक पीटी गणवेश, एक स्वेटर, एक रेनकोट दिला जातो. तसेच शालेय साहित्यामध्ये दप्तर, वह्या, पुस्तके, बूट, प्रयोगवही व इतर साहित्य दिले जाते. या विविध साहित्यांचे वाटप न करता त्याचे पैसे विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. शिक्षण विभाग प्रथमच विद्यार्थ्यांसाठी डीबीटी करणार आहे.

महापालिकेच्या 105 प्राथमिक तर 18 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे.
दप्तर, रेनकोट, काळे बूट, पी.टी शूज, मोजे, पाणी बॉटल, कंपास पेटी, व्यवसायमाला, स्वाध्यायमाला, चित्रकला वही, नकाशा, 100 आणि 200 पानी वही या साहित्याचे बाजारातून दर घेतले असून त्यानुसार पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन हजार पाचशे रुपये तर पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन हजार सातशे रूपये देण्यात येणार आहेत. हे पैसे विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.

Related posts

रावेत: ‘जीवनदायीनी’नद्यांवर प्रदूषणाचे संकट,पालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावी अशी मागणी

pcnews24

दिघी :महिलेच्या पर्समधून पीएमपी बस प्रवासात 59 हजाराची रोकड लंपास

pcnews24

चिंचवड:वायुगळतीच्या वृत्ताने अग्निशमन विभागाची उडाली एकच धांदल

pcnews24

महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा,गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न.आयुक्त शेखर सिंह यांची माहिती,शिक्षण विभागावर ‘कोअर कमिटी’!.

pcnews24

ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सातुर्डेकर यांना ‘हिंदरत्न कामगार पुरस्कार’प्रदान

pcnews24

“भारतीय उद्योगांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करणारे आयटीआय ट्रेड ओळखणे” या विषयावर उद्योगनगरीत कार्यशाळेचे आयोजन.

pcnews24

Leave a Comment