राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आयोजन
राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयानंतर यावरून वाद निर्माण झाला होता.त्याच दरम्यान महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद विशेष कार्यकारिणी आणि विशेष सर्व साधारण सभेचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील वारजे येथे करण्यात आले आहे.या सभेला राज्यभरातील 45 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
या सर्व घडामोडी दरम्यान शरद पवार यांनी वारजे येथील कुस्ती संकुलात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद विशेष कार्यकारिणी आणि विशेष सर्व साधारण सभेचं आयोजन केले आहे.या बैठकीला राज्यभरातील जिल्हा कुस्ती संघ आणि सहयोगी असे एकूण 45 संघांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.आता या बैठकीमध्ये नेमके कोणते ठराव केले जातात.याकडे खेळाडूंचे लक्ष लागून राहिले आहे.