संपूर्ण कुटुंबाला पट्ट्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना
पिंपरी चिंचवड – दिघी येथे शुक्रवारी (दि.2) सायंकाळी एका तरुणाने संपूर्ण कुटुंबालाच कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली.आपल्या विरोधात मंत्रालयात व महावितरण येथे केलेली तक्रार मागे घेतली नाही त्यावरून हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली असून कुणाल सोपान गायकवाड (वय 23 रा. हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीला आरोपीने माझ्या विरोधात मंत्रालयात व महावितरण कंपनी येथे केलेली तक्रार मागे म्हणत शिवीगाळ केली व कमरेच्या बेल्टने मारहाण केली. यावेळी फिर्यादी हे वाचविण्या साठी गेल्या असता आरोपीने त्यांना व त्यांच्या मुलांना बेल्टने मारहाण केली.तसेच फिर्यादीचा गळा आवळून त्यांच्या हाताची नस काचेने कापण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीला ढकलून देत त्यांचा विनयभंग केला. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.