लातूरच्या सृष्टीचा सलग 127 तास डान्स
लातूरच्या सृष्टी जगतापने इतिहास रचला आहे. तिने सलग 127 तास डान्स करण्याची विक्रमी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत 29 मे रोजी सुरु केलेला डान्स सृष्टीने 127 तासांनंतर संपवला. त्यामुळे आता तिची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. सृष्टी अकरावीत असून ती लातूरच्या दयानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. याआधी नेपाळच्या मुलीच्या नावावर हा विक्रम होता.