केवळ 35 पैशांत 10 लाखांपर्यंतचा विमा
ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हळहळला आहे. या अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 750 जण जखमी आहेत. जर आपणही रेल्वेने प्रवास करत असाल तर तिकीट बुक करताना नेहमी 35 पैशांचा विमा भरत जा. यामुळे तुम्हाला दुर्दैवाने काही झाले तर रेल्वेकडून 10 लाखांपर्यंत अपघात विमा संरक्षण दिले जाते. हा तुमच्या घरच्यांसाठी मोठा आधार असेल. त्यामुळे रेल्वेचे तिकीट बुक करताना त्याकडे दुर्लक्ष करु नका.