भारतीईंना पीसीन्युज२४ चा सलाम !!! 54 व्या वर्षी दहावीत मिळवले 54 टक्के गुण
नुकताच दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अनेकांनी खडतर परिस्थितीवर मात करत दहावीत चांगले गुण मिळवले. अशीच एक घटना नगरमधील आहे. येथील 54 वर्षाच्या भारती भगत यांनी दहावीत 54 टक्के गुण मिळवले आहेत. अंगणवाडी सेविका असलेल्या भारती भगत यांना परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही. पण या वयातही बोर्डाची परीक्षा देण्याचा त्यांनी निश्चित केले आणि त्यात यश देखील मिळवले.