आंबेडकरांचं महाविकास आघाडीबाबत मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. सध्याच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात महाविकास आघाडी एकत्र राहिल असे वाटत नाही. कुठल्या तरी कारणाने महाविकास आघाडीत भांडणे होऊन खेळखंडोबा होईल आणि यातून ते वेगळे होतील, असे ते म्हणाले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुर्ला येथे सत्ता परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली होती. येथे ते बोलत होते.