September 28, 2023
PC News24
गुन्हा

पुण्यात वाढते आहे कोयत्यांची दहशत

पुण्यात वाढते आहे कोयत्यांची दहशत

पूर्ववैमनस्यातून कोयते उगारून दहशत माजवण्याचा प्रकार पुणे, शिवाजीनगर भागातील वडारवाडी येथे घडला आहे. टोळक्याने दुचाकी, रिक्षा आणि मोटारीची तोडफोड केली.

या प्रकरणी रवि ओरसे (वय 42, रा. जुनी वडारवाडी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पाच ते सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओरसे हे वडारवाडी भागातील गोलंदाज चौकात थांबले होते. त्या वेळी पाच ते सहा जण तेथे आले आणि त्यांनी ओरसे यांच्या मोटारीची काच फोडली. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या रिक्षा, दुचाकींची तोडफोड केली.
त्यांच्याकडे दांडके आणि कोयते होते. टोळक्याने परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली व नंतर पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक (चतु:शृंगी पुणे) अनिल केकाण तपास करत आहेत.

Related posts

हडपसर:कर्जदार महिलेच्या घरी वसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्यांची अश्लील शिवीगाळ करत दहशत.

pcnews24

चिंचवड:पत्नी व तिच्या घरच्यांकडून पतीचा घटस्फोटासाठी छळ, पतीची आत्महत्या

pcnews24

पिंपरी चिंचवड:सावधान!! दररोज शेकडो लोकांची होते ऑनलाईन टास्क फसवणुक

pcnews24

पिंपरी चिंचवड मधील महाविद्यालयात घडला हा प्रकार.

pcnews24

हडपसर:प्रियकरानं कर्जाचे हप्ते थकवल्यामुळे तरुणीची आत्महत्या.

pcnews24

समुपदेशन कार्यक्रमातून चार वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीसोबत घडलेली बलात्काराची घटना उघड

pcnews24

Leave a Comment