September 23, 2023
PC News24
राजकारण

अजित पवार विरुद्ध संजय राऊत वादामध्ये राऊत यांची माघार

अजित पवार विरुद्ध संजय राऊत वादामध्ये राऊत यांची माघार

राजकीय नेत्यांबद्दल प्रतिक्रिया देत असताना थुंकण्याच्या कृतीवरुन संजय राऊत हे सध्या अडचणीत सापडले आहेत. त्याला अजित पवार यांनी प्रतिउत्तर दिल्यामुळे अजित पवार विरुद्ध संजय राऊत असा वाद रंगला आहे.

पुण्यात वाढते आहे कोयत्यांची दहशत

अजित पवार यांनी संजय राऊत यांच्या कृतीविषयी भाष्य केल्यानंतरया वादाला तोंड फुटले होते.धरणामध्ये लघुशंका करण्यापेक्षा थुंकणे चांगले, असा खोचक टोला हाणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना राऊत यांनी लक्ष्य केले होते. परंतु संजय राऊत यांनी आता या वादातून सपशेल माघार घेतली आहे.

अजित पवार यांनी संजय राऊत यांच्या बोचऱ्या टीकेनंतरही सामंजस्याची भूमिका घेतली होती. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आहे. प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागावे. ते मोठे व महान नेते आहेत. त्यांच्या बोलण्याने अंगाला छिद्र पडत नाही, असे सांगत अजित पवार यांनी या वादावर पडदा टाकला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनीही अजित पवार यांच्याविषयी कठोर शब्दांत केलेल्या टीकेविषयी खेद व्यक्त करत आपल्या बाजूनेही हा वाद संपल्याचे संकेत दिले आहेत. मध्यामांशी बोलताना राऊत म्हणाले अजित पवार यांच्याविषयी अर्धवट माहितीच्याआधारे मला प्रश्न विचारण्यात आला. मी आणि अजितदादा कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देतो. मी अजित पवार यांच्याविषयी कडक शब्दात बोललो, त्याचा खेद व्यक्त करतो.

Related posts

गणेशोत्सवानिमित देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर.

pcnews24

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार महाविकास आघाडी – जयंत पाटील.

pcnews24

‘तुरूंगात टाकले तरी लढत राहणार’ :शरद पवार.

pcnews24

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा रविवारी पिंपरी चिंचवड शहरात.

pcnews24

सुप्रीम कोर्टात कोणकोणत्या याचिका आहेत ? – सत्तासंघर्षाप्रकरणी प्रमुख 4 याचिका कोर्टात दाखल आहेत.११:४० वा.निकाल.

pcnews24

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांच्या दोन मोठ्या घोषणा, नक्की काय म्हणणे आहे ते समजून घेऊयात.

pcnews24

Leave a Comment