September 28, 2023
PC News24
गुन्हा

खाद्यपदार्थ व्यावसायिकावर कोयत्याने वार

पिंपरी:खाद्यपदार्थ व्यावसायिकावर कोयत्याने वार

चायनीज खाद्यपदार्थाच्या गाडी चालकावर कोयत्याने वार करत त्याला लुटले.
तसेच या आरोपींनी व्यावसायिकाच्या भावालाही जीवे मारणार असल्याची धमकी दिली. ही घटना वायसीएम हॉस्पिटल समोर शुक्रवारी (दि. 2) दुपारी तीन वाजताच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

राजू चंद्रकांत थापा (वय 34, रा.नेहरूनगर, पिंपरी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिंक्या उर्फ अमरकवलसिंग चौहान (वय 33, रा. विठ्ठलनगर, पिंपरी), साहिल सुधीर धनवे (वय 22, रा. महेशनगर, पिंपरी) सोन्या रणदिवे, अक्षय रणदिवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कारमधून फिर्यादीच्या चायनीज खाद्यपदार्थाच्या गाडीवर काम करण्याच्या ठिकाणी गेले असताना . ‘तुझा मोठा भाऊ कुठे आहे. त्याची विकेट टाकायची आहे’ अशी धमकी देत फिर्यादी यांच्या खिशातून जबरदस्तीने साडेतीन हजार रुपये काढून घेतले.त्यानंतर फिर्यादी यांच्या हातावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. तसेच फिर्यादीस खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून परिसरात दहशत पसरवली असल्याचे फिर्यादीत नोंद केले आहे. पिंपरी पोलीस आधिक तपास करीत आहेत.

Related posts

येरवडा कारागृहात पुन्हा मोबाईल सापडला,काय प्रकार आहे वाचा.

pcnews24

उपायुक्त जगतापांना कारणे दाखवा नोटीस.

pcnews24

मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

pcnews24

पाकिस्तानी एजंटसोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याप्रकरणी पुण्यातील डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना अटक

pcnews24

तडीपार गुंडावर गुन्हा तर तिघांना अटक, पिस्टल व जिवंत काढतुस प्रकरणी रावेत येथे कारवाई

pcnews24

पुण्यात अडीच वर्षांत महिलांवरील गुन्हे वाढले, एकतर्फी प्रेमातून पाच जणींची हत्या तर काहीना धमकी, हल्ला.

pcnews24

Leave a Comment