February 26, 2024
PC News24
गुन्हा

मोबाईल नंबर ब्लॉक करूनही गुगल पे,फोन पे वर अश्लील मेसेज करीत महिलेचा विनयभंग

मोबाईल नंबर ब्लॉक करूनही गुगल पे,फोन पे वर अश्लील मेसेज करीत महिलेचा विनयभंग


महिलेचे व्हिजिटिंग कार्ड घेऊन त्यावरील मोबाईल नंबरवरून त्यांच्याशी जवळीक साधत सुरुवातीला संपर्क केला पण मेसेज करणाऱ्या व्यक्तीची वर्तणूक सुरक्षित न वाटल्याने त्याचा नंबर महिलेने ब्लॉक केला.हा प्रकार 1 जून रोजी दुपारी तीन ते 2 जून रोजी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या कालावधीत चिखली, सासवड येथे घडला. याप्रकरणी पिडीत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार आरोपी राकेश कुमार यदुवंशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना काम ,
देण्याबाबत सांगून फिर्यादीची इच्छा नसताना त्यांच्याशी जवळीक साधली. फिर्यादीचे व्हिजिटिंग कार्ड घेऊन त्यावरील मोबाईल नंबरवर आरोपीने संपर्क केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या गुगल पेवर अश्लील मेसेज केला. फिर्यादी यांनी गुगल पेवर देखील आरोपीला ब्लॉक केले. आरोपी तिथेही थांबला नाही. त्याने फिर्यादी यांच्या फोन पेवर अश्लील मेसेज करून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादी यांनी आरोपीला फोन पे वर देखील ब्लॉक केले व थेट पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिखली पोलीस आधिक तपास करीत आहेत.

Related posts

मुलीची हत्या करून आरोपीची आत्महत्या!!

pcnews24

पुण्यातील मंचर येथे लव्ह जिहाद?..गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

pcnews24

बिजली नगर चिंचवड परिसरातील हरितपटा नामशेष होण्याच्या मार्गावर,सखोल चौकशीची मागणी

pcnews24

पुण्यात ३० वर्षीय महिला कंडक्टरचा विनयभंग, सहकाऱ्याला अटक

pcnews24

कंटेनर चालक कामगाराने स्वतःच्याच ऑफिसमध्ये केली चोरी.

pcnews24

येरवडा कारागृहात पुन्हा मोबाईल सापडला,काय प्रकार आहे वाचा.

pcnews24

Leave a Comment