सात्विक,सोज्वळ सौंदर्य काळाच्या पडद्याआड,ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी ९४व्या घेतला अखेरचा श्वास
मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीच्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर उर्फ सुलोचना दीदी यांनी वयाच्या ९४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांचा जन्म 30 जुलै 1928 ला झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर1943 साली सहकलाकार म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर राजकपूर शम्मी कपूर, शशी कपूर या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढी बरोबरही त्यांनी काम केलं.
‘वहिनीच्या बांगड्या,’’मीठ भाकर’ ‘मराठा तितुका मेळावा’ साधी माणसं, कटी पतंग हे त्यांचे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले गाजलेले चित्रपट आहेत. या सिनेमांमध्ये त्यांनी घरंदाज भूमिका साकारल्या होत्या. सुलोचनादीदींनी २५० हून अधिक मराठी तसेच हिंदी सिनेमांत आपल्या अभियानाची छाप पाडली. त्यांचे अनेक सिनेमे गाजले. सुलोचना दीदी म्हणून त्या सगळीकडे ओळखल्या जाऊ लागल्या.
पद्मश्री तसंच महाराष्ट्र भूषणनं सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर चित्रपटातली आई म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. दादर येथील खासगी रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित संसर्गानं आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. चित्रपटात आल्या तेव्हा त्यांची भाषा इतकी शुद्ध नव्हती.म्हणून भालजी पेंढारकरांनी त्यांच्यासाठी एक संस्कृत मासिक लावलं होतं. मराठी बरोबर हिंदी चित्रपटांतही त्यांनी अनेक उत्तम भूमिका साकारल्या होत्या.