जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेतर्फे विविध उपक्रम
निसर्गराजा मित्र जीवांचे यांच्या माध्यमातून आणि TomTom India Pvt. Ltd. यांच्या सहकार्याने ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कूल, महाळूंगे(इंगळे) या ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेल्या बोटानिकल गार्डन
चे उद्घाटन जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने (दि.५जून २०२३) सकाळी ८ वा. संपन्न होणार आहे.
थ्री पिरॅमिड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. शिवळे पाटील यांच्या अध्यक्षतेत आणि टॉम टॉम इंडिया लिमिटेड पुणे यांच्या साईट हेड सौ.दया ओगले,थ्री पिरॅमिड एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. रोहिदास रोकडे, आणि सचिव श्री. योगेश रोकडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना रोकडे आणि निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अतुल वाघ यांच्या मार्गदर्शनात संस्थेच्या स्वयंसेवकांनी केले आहे.
दुर्मिळ होत चाललेल्या स्थानिक औषधी वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने हे गार्डन निर्माण करण्यात आले आहे.यात पक्षी,मध माश्या, फुलपाखरे यांच्या आवडीची झाडे, नक्षत्र, राशी यांची आराध्या वनस्पती , विविध वेली, गवते यांचा समावेश एका ध्यान मंदिरांच्या समवेत असणार आहे. त्याच बरोबर नागरिकांना वन्य जीवांची शास्त्रोक्त माहिती मिळावी म्हणून निसर्गराजा मित्र जीवांचे आणि स्केल अँड टेल संस्थेच्या माध्यमातून रोज एका प्राण्याची माहिती मराठीमधून समाज माध्यमात प्रसारित करण्यात येणार आहे, अशी माहिती निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेचे संचालक श्री. रमेश कदम यांनी दिली.