चिंचवड आनंदवन सोसायटी मधे बहरली सफरचंद,बागप्रेमींची आवर्जून भेट
फ्लॅट संस्कृती मधेही बागबगीचा शौक खूप जणांना असतो. पण यातही एक वेगळा प्रयोग चिंचवड येथील रहिवासी तुषार समेळ, व सोनिया समेळ यांनी केला आहे. चिंचवड जुना जकात नाका चौक येथील आनंदवन सोसायटीमध्ये असलेल्या समेळ यांच्या टेरेसवर त्यानी टेरेसवर फुलवलेल्या बागेत एक नव्हे तर चक्क 25 हुन अधिक सफरचंद बहरली आहेत.एक वर्षापेक्षा जास्त काळ मेहनत घेत अखेर अतिशय प्रतिकूल वातावरणात सफरचंद आलेली पाहून समेळ कुटुंब पण आनंदित झाले.
ही सफरचंद पाहण्यासाठी बागप्रेमीही आवर्जून भेट देत आहेत.
वास्तविक जम्मू काश्मीर मधील थंड वातावरणात वाढणारे हे झाड आहे. पण चिंचवड येथे सध्या कडक उन्हाळा असल्याने या वातावरणात सफरचंद हे अशक्यप्राय होते.परंतु
नियमित देखभाल, कीटकनाशक फवारणी, प्रसंगी उन्हा पासून संरक्षण देत खूप मेहनत करून बागेत सफरचंद फुलवण्याचं स्वप्न साकार झाल्याचे समेळ यांनी सांगितले.