BREAKING – ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे अपघात (व्हिडिओ सह)
ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे अपघात झाला आहे. ओडिशाच्या बारगढ येथे मालगाडीचा अपघात झाला आहे. मालगाडीचे 5 डब्बे रूळावरून उतरले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले. बालासोरमधील घटनास्थळापासून सुमारे 500 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बारगढमध्ये हा अपघात झाला. चुनखडी वाहून नेणाऱ्या एका मालगाडीचे काही डबे रुळावरून घसरले.
व्हिडिओ सहयोग पीटीआय.