मनोरुग्ण महिलेवर बलात्काराची गंभीर घटना
मनोरुग्ण तरुणीच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्यावर एकाने वेळोवेळी बलात्कार केला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार मे 2022 ते मार्च 2023 या कालावधीत निगडी व येवलेवाडी येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी मनोरुग्ण आहे हे माहिती असताना देखील आरोपीने तिच्याशी जवळीक साधत तिचा विश्वास संपादन केला व तिच्यावर मे 2022 मध्ये बलात्कार केला. तसेच पुढे मार्च 2023 मध्ये सुद्धा त्याने बलात्कार केला.याविषयी मुलीच्या पालकांनी आरोपीला जाब विचारला असता आरोपीने जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्याच्या या कामात त्याला सहकार्य केल्याबद्दल महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपीचे नाव माणिक नानाभाऊ ढोरे (वय 35) असून आणखी एका महिलेवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकऱणी पीडित मुलीच्या आईने रविवारी (दि.4) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीला अटक करून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.