February 26, 2024
PC News24
जीवनशैलीसामाजिक

निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेमार्फत चाकण येथील शाळेत बोटॅनिकल गार्डनची निर्मिती

निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेमार्फत चाकण येथील शाळेत बोटॅनिकल गार्डनची निर्मिती

निसर्गराजा मित्र जीवांचे यांच्या माध्यमातून आणि TomTom India Pvt. Ltd. यांच्या सहकार्याने ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कूल महाळुंगे (इंगळे) या ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेल्या बोटॅनिकल गार्डनचे उद्घाटन जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने (दि.५जून) सकाळी ८ वाजता संपन्न झाले.
विद्यार्थ्यांना दुर्मिळ होत चाललेल्या स्थानिक औषधी वनस्पतींची माहिती व्हावी या उद्देशाने हे गार्डन निर्माण करण्यात आले आहे. यात पक्षी, मध माश्या, फुलपाखरे यांच्या आवडीची झाडे, नक्षत्र, राशी यांची आराध्या वनस्पती , विविध वेली, गवते यांचा समावेश आहे, तसेच एक ध्यान मंदिर येथे तयार करण्यात आले आहे. या उद्यानात १२० प्रजातीच्या ३०० वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.

थ्री पिरॅमिड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अविनाश शिवळे पाटील यांच्या अध्यक्षतेत आणि टॉम टॉम इंडिया लिमिटेड पुणे यांच्या साईट हेड सौ. दया ओगले , थ्री पिरॅमिड एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. रोहिदास रोकडे, आणि सचिव श्री. योगेश रोकडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. वंदना रोकडे आणि निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अतुल वाघ यांच्या मार्गदर्शनात संस्थेच्या स्वयंसेवकांनी केले होते.

संपूर्ण शाळा प्लास्टिक मुक्तीकडे घेऊन जाण्याचे नियोजन आहे, तसेच शाळेमध्ये ग्रीन क्लब सुरू करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती करण्याचा मानस यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना रोकडे यांनी मनोगतात व्यक्त केला.

नागरिकांना वन्य जीवांची शास्त्रोक्त माहिती मिळावी म्हणून निसर्गराजा मित्र जीवांचे आणि स्केल अँड टेल संस्थेच्या माध्यमातून रोज एका प्राण्याची माहिती मराठी मधून समाज माध्यमात प्रसारित करण्यात येणार आहे, या उपक्रमाचा शुभारंभ थ्री पिरॅमिड एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. योगेश रोकडे यांनी त्यांच्या शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आजची माहिती पाठवून केला.अशी माहिती निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेचे संचालक श्री. तुषार जाधव यांनी दिली.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराजांना शिवप्रेमी देणार शनिवारी मानवंदना,शिवजयंती समन्वय समिती आणि ढोल ताशा महासंघाने केले आयोजन.

pcnews24

महाराष्ट्र: पुढील तीन तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा.

pcnews24

मेड इन इंडिया आयफोन, लॅपटॉप लवकरच उपलब्ध

pcnews24

सुप्रसिद्ध बेडेकर लोणची-मसाले उद्योग समूहाचे अतुल बेडेकर यांचं ५६ व्या वर्षी निधन.

pcnews24

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे पुसेसावळी, सातारा येथे दंगल,एकाचा मृत्यू.

pcnews24

‘पीएमआरडीए’च्या लाभार्थ्यांना वीजजोडणीसाठी भोसरीच्या महावितरण कार्यालयात मदत कक्ष

pcnews24

Leave a Comment