मणिपूरमध्ये 100 घरांना आग
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. काकचिंग जिल्ह्यातील सैरो गावात रविवारी काही हल्लेखोरांनी 100 घरांना आग लावली आहे. जमाव मोठ्या संख्येने होता आणि त्यांनी काँग्रेस आमदार के. रंजीत सिंह यांच्या घरावरही हल्ला केल्याचे वृत्त आहे. यातून आमदाराचे कुटुंबिय सुदैवाने बचावले. दरम्यान आरक्षणाच्या मुद्यावरून येथे दोन समुदायात वाद आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण आहे.